'मनोगत'चे नवे रूप (जून २००६)

'मनोगत'चे उर्ध्वश्रेणीकरणासाठी आपले प्रशासक नेहमी प्रयत्नशील असतात.


गेल्या दोन दिवसांत 'मनोगत'च्या रूपांत आणखी काही बदल करण्यात आलेले दिसतात.


त्यातला जाणवलेले सर्वात मोठे बदल म्हणजे
१. प्रतिसादांची मांडणी आणि
२. 'मनोगत'वरचा स्वयंचलित आणि अनिर्बध वावर रोखण्यासाठी वेळोवेळी होणारी तपासणी.


एखाद्या लेखनप्रकारावर टिचकी मारली असता सर्व प्रतिसाद अंगभूतरीत्या उघडलेले असतात. सर्वान जुना प्रतिसाद सर्वात मोठ्या पृष्ठक्रमांकावर असतो तर सर्वात नवीन प्रतिसाद क्र.१ च्या पृष्ठक्रमांकावर असतो.


या मांडणीमुळे खालील अडचणी जाणवल्या-
१. नवीन प्रतिसाद नक्की कोणता हे एका नजरेत कळत नाही.
२. एकाच लेखनप्रकारावरचे प्रतिसाद वाचत असताना किमान एकदा तरी 'वावर तपासणी'ला सामोरे जावे लागते.
३. जे प्रतिसाद जुन्या मांडणीमध्ये अक्षरशः १० सेकंदात (आंतरजाल जोडणीच्या वेगावर अवलंबून) शोधून, उघडता आले असते. असे प्रतिसाद केवळ शोधण्यासाठीच ३० किंवा अधिक सेकंद लागत आहेत.


प्रतिसादांची अशी मांडणी करण्यामागचे धोरण, कारण आणि तांत्रिक बाजू यावर अधिक माहिती प्रशासकांनी उपलब्ध करून दिल्यास आवडेल.


याच चर्चेत 'मनोगत' वरील नवीन बदल, सोयी, सुविधा यांबद्दलही चर्चा होऊ शकते.