उदार
उलटाच वार झाला
भलताच ठार झाला
मौनात राहिलो मी
शब्दास भार झाला
देणेकरी सदा मी ..
माझा पगार झाला!
व्यवहार रोख झाला....
त्याचा प्रचार झाला!
स्वप्नात लाजली ती..
खोटा नकार झाला.
आता विचारु का रे?
नुसता विचार झाला
संगे चला म्हणाला
मृत्यू उदार झाला
हा कारकून कोण?
कोठे पसार झाला?
-कारकून