अर्पण

स्वतःस पावसास अर्पिते
उसासते, धरा सुवासते

छ्चोर सूर्य छेड काढतो
पहाटव्योम लाजलाजते

धुक्यात लोपल्या दिशा जुन्या
नवे क्षितिज मना खुणावते

पथिक अजून थांबला कुठे
थकून वाट का विसावते

शिखर असो सुरम्य साजिरे
वसावया दरीच लागते

जळात मी असून कोरडी
सरस्वती उगीच वाहते

दुधाळ पौर्णिमेपरी तुझ्या
मिठीत मृण्मयी प्रकाशते