'तुला पाहिले'

कडमडताना तुला पाहिले
लुडबुडताना तुला पाहिले

हात तिचा मी हाती धरता
चरफडताना तुला पाहिले

मेघ जाइना निरोप घेउन
बोंबलताना तुला पाहिले

सृजनशीलता भींतीवरती
खरवडताना तुला पाहिले

नदीकिनारी तिची पातळे
खळबळताना तुला पाहिले

कंठ दाटला, शब्द फुटेना
खाकरताना तुला पाहिले

कुंथत होतो प्रतिभेसाठी
डरडरताना तुला पाहिले

मोह दाटता पंचा सुटला
सावरताना तुला पाहिले

धीर धरी रे खोडसाळ तू
धसमुसताना तुला पाहिले

प्रेरणास्थानः प्रवासी ह्यांची "तुला पाहिले".
इथे वाचा.