साहित्यसम्राट अण्णभाऊ साठे जयंती

   आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती! शतशः अभिवादन!


               अण्णाभाऊ साठे यांच्या एकुण १४ कादंबऱ्या , अनेक कथासंग्रह तसेच अनेक स्फूट लिखाण प्रसिद्ध झाले आहे. अनेक कादंबऱ्यांवर चित्रपटसुद्धा निघाले आहेत. 'फकिरा' या अतिशय गाजलेल्या कादंबरीच्या तर आतापर्यंत १९ आवृत्त्या निघाल्या आहेत.


              अण्ण्भाऊ फक्त काळ्यावर पांढरं करणारे पांढरपेशे लेखकु नव्हते तर लोकनाट्याच्या माध्यमातून साम्यवादाचा विचार समाजात पोहचवणारे खंदे शाहिर होते.


              "जग बदल घालुनी घाव,सांगुनी गेले मज भिमराव" या त्यांच्या ओळींना समोर ठेवून डॉ. एकनाथ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा अखिल मातंग समाज बौद्ध धर्माच्या छत्राखाली एक होत आहे.


                हिंदू धर्मातील एक आणखी उपेक्षीत घटक उज्ज्वल भवितव्याच्या मार्गावर निघाला आहे. आजच्या या जयंतीदिनी त्या उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा !