"होतो तसाच आहे मी" - २

प्रेरणा ः अजब ह्यांची 'होतो तसाच आहे मी' ही गझल. www.manogat.com/node/6875

फोटोतलाच आहे मी
होतो तसाच आहे मी

आशा फसली शब्दांना
म्हणता तिचाच आहे मी

बाप तिचा खाई फाडुन
भित्रा ससाच आहे मी

झाल्या किती वधू माझ्या
तरिही उभाच आहे मी

आयुष्याच्या पानाचा
बघ तोबराच आहे मी

रोज नव्या थापा मारुन
थकलो अताच आहे मी

मैफल डुलक्या घेते अन
गातो उगाच आहे मी

खोडसाळ वादळ आले
पळतो फुकाच आहे मी