कथा

सरळ-सोपी सर्वथा...
ही तुझी-माझी कथा!


वार झेलू हासुनी!
वेगळी आणू प्रथा...


मीच का आलो पुढे?
राहिला मागे जथा...


शिखर सारे पाहती
सापडेना पायथा!


सावली मिळता तुझी
संपली सारी व्यथा!


- कुमार जावडेकर, मुंबई