संसारपराङमुख असशी तू

संसारपराङमुख असशी तू

संसारपराङ्मुख असशी तू | मिळणार तुजसी ईश्वर ऽ काय ऽ ? ||
ह्या लोका न तू आपले म्हणसी | त्या लोकीही तू खंतची करशील || धृ ||

हे काय असे पाप आणि पुण्य | रीतींवर धर्माची मोहोर जणू ||
प्रत्येक युगाच्या धर्माला | आदर्श कसा घडविशील तू || १ ||

हे भोगही एक तपस्या असे | समजे का तुला त्यागापायी ||
होतो अपमान रचयित्याचा | केला अव्हेर रचनेचा जरी || २ ||

मी म्हणते हे जग आपले आहे | तू म्हणसी ते खोटं स्वप्न आहे ||
मी जन्म व्यतीत करून जाईन | तू जन्म गमावून की जाशील || ३ ||


संसार से भागे फिरते हो



मूळ हिंदी गीत: साहीर लुधियानवी
संगीत: रोशन
गायीका: लता
चित्रपट: चित्रलेखा
भूमिका: मीनाकुमारी, प्रदीपकुमार, अशोककुमार


मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०८१५