ऍज सिंपल ऍज दॅट

मी हे सर्व कां करतोय ?


काहीवेळा मला हा प्रश्न पडतो व मी स्वतःला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो‌, सिनेमा/मालिकांमध्ये नाही कां


आरशातलं प्रतिबिंब कुत्सित हसत....खिजवतं तसंच काहीसं


मी--  मी हे सर्व कां करतोय ?


प्रति.-- किडे दुसरं काय ?


मी--  ते जरी मान्य केलं तरी समाधान मिळवणं/वेळ घालवणं /रिकामपणाचे 'तुमडी' उद्योग/आपलाच संवाद कुणाशीतरी ......


प्रति-- बस्स् ! हाच शब्दजंजाळपणा समोर कुणी सहन करत नाही....कलटी मारतात ना म्हणून इथे


मी--  कंपू करुन यात तर मी शिरलेलो नाही.मनासारखं विचार करता यावं, ते प्रगट करता यावेत आणि ते कुणीतरी, केव्हा तरी वाचावेत असं वाटतं म्हणून मी हे करतोय


प्रति--- पण इथे तरी वेगळा अनुभव की तेच नन्नाचे पाढे ?


मी--  तूच जास्त चांगलं सांगशील.


प्रति--- तर ऐक. प्रत्येकालाच वाटतं की मनासारखं विचार करता यावं, ते प्रगट करता यावेत......पण इतकंच बरं कां ठोब्या, तू पुढचं जे म्हणतोस की  ते कुणीतरी, केव्हा तरी वाचावेत असं वाटतं म्हणून ...तर तू विसरुन जा ....कां म्हणून विचार


मी--  विचारलं तर.....


प्रति--- कारण ते तुझ्या हाती नाही. ऍज सिंपल ऍज दॅट