बेडी-

परिचय- तुरुंगात कैद्याना शिक्षा म्हणून घातलेली बेडी एकाद्या अलंकाराप्रमाणे घसून पुसून चक्क ठेवणे भाग़ पडते. या व्यवहाऱीक विरोधाभासावरुन एक तात्विक विरोधाभास तत्यारावाना सुचला तो.


 


'उजळित उजळित जे ! काय करी


लालिसि तूं दिवसभरी


बंदी चांदिचे ! किंवा ते


अलंकार सोनेरी ?'


अजि नचि !केवळ ती!लोखंडी


बेडी माझी, खंडी


जखडोनि माझ्या ! या पाया


स्वेच्छ गती ती चंडी


'फ़ोडुनि तोडुनि जी ! जाळावी


तीच कशी उजळावी


आपण आपुलिची ! रे बेडी


हौस तुझी ही वेडी !'


सुटते तुटते ही ! नचि होती


परि जोंवरि तोंवरती


गंजे ती परि की ! गांजी या


अधिक आपल्या पायां


'चरणासि सतत इच्छेच्या ! जी वेढी


घडिं कवण विधी निषेधांची ! ही बेडी'


जाणे कोण अजी ! निश्चित ते


परंतु की मज गमते


इच्छे घडि त्याची ! इच्छाचि


वा बेडी तदिच्छेची !


स्त्रोत<समग्र सावरकर<काव्य