शोध घेते नजर का अशी वेंधळी? - २

शोध घेते नजर का अशी वेंधळी?
चारचौघींपरी तू, कुठे वेगळी?

नेहमीसारखी ढिम्म तू राहिली
आज आलिंगनी हो तरी मोकळी

लाजणारी नको घेउ तू ओढणी
पाहु दे ना तुला मोकळी मोकळी

लाटणे घे करी, चार पोळ्या बडव
कोकलू लागली ही उदर-पोकळी

काय झाडूतल्या त्या हिऱ्या बोलल्या
मारली का मला सांग कोपरखळी?

तू मला दे झणी तंदुरी कोंबडी
मी तुला अर्पितो कोवळी मांधळी

कैद करताच तू कंप सुटला मला
रंगरूपास भुललो नि गेलो बळी

द्वाड पोरे तुला शीळ का घालती
चॊकलेटातली त्या दिसे ना अळी?

का विषय काढता इंद्रियांनो असे?
ती व्रतस्था असे सोवळी सोवळी

खोडसाळा जरी पान तू व्यापले
हाय, दुर्लक्ष करतात ना मंडळी !?

आमची प्रेरणा - प्रवासी ह्यांची सुंदर गझल -
शोध घेते नज़र का अशी वेंधळी?