चटपटा मका

  • ४ वाटी मक्याचे दाणे (शक्यतो कोवळे दाणे घ्यावेत.)
  • २-३ चमचे बटर
  • २ -३ चमचे चाट मसाला(आवडीनुसार कमी-जास्त घेता येइल)
  • १/२ वटी बारिक चिरलेला कांदा
  • १ चमचा लिंबु रस(आवडीनुसार कमी-जास्त घेता येइल)
  • १ चमचा लाल तिखट
१५ मिनिटे
४ जणांसठी

मंद आचेवर बटर वितळवुन घ्यावे आणि त्यात कांदा चांगला परतवुन घ्यावा. कांदा  चांगला परतला की त्यत मक्याचे दाणे घालावे . १ मिनीट परतवुन त्यात चाट मसाला , लाल तिखट आणि लिंबु रस घलावे. मका थोडा सॉफ़्ट होइल इतपतच परतावा.

हा पदार्थ गरम गरम खाण्यास द्यावा‌.

स्वानुभव