सगळंच शिकलो जरी मी

सगळंच शिकलो जरी मी


सगळंच शिकलो जरी मी, न शिकली चतुराई |
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी || धृ ||


संसाराने किती समझवले, परके कोण आणि कोण आपले |
लपवून तरीही घाव हृदीचे, तुजसी मी नेहमीच रिझविले ||
स्वत:स वाहून घेण्याची, जिद्दच होती माझी |
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी || १ ||


असली नकली चेहरे दिसले, हृदयी पहारे शंभर दिसले |
दुखर्‍या मम हृदयास विचारा, सोनेरी किती दिसली स्वप्ने ||
तुटला तो तारा जो, अवलोकित होतो मी |
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी || २ ||


भग्न हृदय होतांना दिसले, प्रेमरंग उडतांना दिसले |
जगणारे सारेची मजला, दौलतीवर जीव टाकत दिसले ||
जिवास जीव देणारे, परी मरती भिकारी |
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी || ३ ||


मूळ हिंदी गीत: सब खुछ सिखा हमने
गीतकारः शैलेंद्र, संगीत: शंकर जयकिसन, गायक: मुकेश
चित्रपट: अनाडी, भूमिका: राजकपूर


मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०८२५