आवडलेली कविता ३- हस्तांतर



हस्तांतर


विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणला : द्या इकडे.

मी ती मूर्ती तत्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या

मी पुन्हा तरुण, ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला . . .

– द. भा. धामणस्कर

'जुन्या नव्याच्या सीमेवर वावरणारी त्यांची कविता प्रतिमांतून भावाविष्कार करते. सुबोध, प्रांजळ, निरलंकृत, अशी ही कविता आत्मलक्षी व संवेदनशील आहे..' (विसाव्या शतकाची मराठी कविता)