कशाला...?

मी फुका जोडे असे झिजवू कशाला?
कमवत्या लेकीस मी उजवू कशाला?

प्राशतो रक्तास, ड्रॆक्यूला असे मी
वाहणारे रक्त मी थिजवू कशाला?

भेळ खातो, पोट भरतो मी कढीने
जेवण्याचे बेत मी शिजवू कशाला

मागतो थंडीत मीही ऊब थोडी
लाकडांना कोरड्या भिजवू कशाला

बायको करते तशीही रोज शिमगा
धुळवडीला मी तिला भिजवू कशाला

टंकण्याचा हट्टही माझाच होता
लेखणीला मी तरी झिजवू कशाला?

खोडसाळाला अता झाली उपरती
लेखकांना चांगल्या खिजवू कशाला?


आमची प्रेरणा - आसवांनी ...इथे वाचा