अभंग गणेशा

सर्वत्र जल्लोष । बहु कंठशोष ।
चालला उद्घोष । स्वागताचा ।।


धरती सजली । सृष्टी बहरली ।
पावसात न्हाली । श्रावणाच्या ।।


येता घरी-दारी । श्रीगणेश स्वारी ।
बाल-थोर सारी । आनंदली ।।


गोमटा सुंदर । लोभस आकार ।
मूर्ति मनोहर । लंबोदर ।।


शांति-समाधान । द्यावे पुनः दान ।
आणिक साधन । नको काही ।।


- कुमार जावडेकर, मुंबई