अब मै राशन की कतारोंमे नजर आता हूं....

जगजित सिंगांच्या या गज़ल चा खरा अर्थ मला आता कळतोय..पुण्यामधले स्वतःचे घर, चारचाकी, आप्त, मित्र सगळे तिकडे सोडून नोकरीमुळे इंग्लंड ला यावं लागलं..इथे तथाकथित समृद्धी वगैरे आहे पण माझ्या सारख्या मित्र आणि नातेवाईकांच्या गोतावळ्यात रमण्याऱ्या माणसाला मात्र हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागलो की काय असं वाटतं आणी या गज़लची पुनःपुन्हा आठवण येते..
नंतर वाटतं माझं ठीक आहे, ६-८ महिन्यात मी परत जाईन पण जे लोक इथे कायम वास्तव्यासाठी येतात त्यांना इथे आल्यानंतर काय वाटत असेल..?