बहाणा...२

नाहीस तू दिवाणा
झोंबायचा बहाणा

मी बोलले न काही
केलास तू ठणाणा

मी राहिले उपाशी
भरलास तू बकाणा

ह्या सुस्त दादल्याला
घालू कशास दाणा ?

बदकात शोधते मी
का व्यर्थ हंसराणा ?

आमची प्रेरणा - जयन्ता५२ ह्यांची गझल 'बहाणा