कारल्याचा भुरका

  • कारली - २
  • फोडणीसाठी : २ चमचे तेल, मोहरी,जीरे, कढीपत्ता,हिंग, तीळ २ चमचे,हळद
  • एका लिंबाचा रस
  • गुळ किंवा साखर १ चमचा
  • चवीनुसार मीठ, तीखट
  • धणे-जीरे पुड -१ चमचा ,खोबर २ चमचे
१५ मिनिटे
२-३

कारल्याचा किस करुन घेणे. फोडणीसाठीचे साहित्य टाकुन फोडणी करुन  घेणे. एका मायक्रोवेव मध्ये ठेवण्या योग्य भांड्यात  कारल्याचा किस, फोडणी ,ईतर साहित्य टाकणे. ३ मिनीटासाठी मायक्रोवेव मध्ये ठेवणे. चमच्याने हलवणे. परत ३ -४ मिनीटासाठी ठेवणे. असे ३-४ वेळा किंवा कारल्याच्या प्रमाणानुसार भुरका कुरकुरीत होईपर्यंत करावे .पुर्ण कोरडा होवु द्यावा. हवी असल्यास कोथींबीर टाकणे.

 

 मायक्रोवेव मध्ये ठेवल्यामुळे पाणी जावुन कोरडा- कुरकुरीत होतो.

अशा रितीने कडु पण पौश्टीक कारले पोटात जाते. : )

मधुमेहासाठी कारले उपयुक्त असते.

 

सासूबाई