मराठी माणसांची संकेतस्थळे

'मनोगत'वरील मराठी संकेतस्थळे! या चर्चेद्वारे मराठी भाषेतून लेखन/वाचन करता येतील अशी संकेतस्थळे संकलित करण्याचा प्रयत्न चालू आहे.



  • मराठीतून संकेतस्थळ चालवण्याचे तांत्रिक ज्ञान नसल्याने म्हणा, किंवा...
  • इंग्लिशमधून संकेतस्थळ चालवणे सोपे असल्याने म्हणा, किंवा...
  • इंग्लिशमधून असलेल्या संकेतस्थळाला तुलनेने मोठा वाचकवर्ग मिळत असावा असे वाटल्याने म्हणा, किंवा...
  • मराठी संकेतस्थळ बनवण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने म्हणा, किंवा...

आणखी कुठल्या कारणाने म्हणा, अनेक लहान-मोठ्या, प्रसिद्ध-अप्रसिद्ध, भारतवासीय-परदेशस्थ मराठी माणसांची संकेतस्थळे इंग्लिशमधून आहेत असे दिसते.

या चर्चेचा मुख्य हेतू विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या आणि/किंवा प्रगतिशील असलेल्या मराठी माणसांच्या संकेतस्थळाचे संकलन करणे हा आहे.


तसेच दुवा देताना एक-दोन वाक्यात ते संकेतस्थळ कोणाचे आणि कशाबद्दल आहे हे सांगितले तर या यादीच्या उपयुक्ततेत भर पडेल असे वाटते.


अर्थात काही मराठी माणसांना 'वाहिलेली' अनेक संकेतस्थळे (उदा० सचिन तेंडुलकर) असू शकतात. तेंव्हा संकेतस्थळांचे दुवे देताना सारासार विचार करावा ही नम्र विनंती.