डाग

समजू नकोस भोळी, चवचाल बाग आहे
मकरंद देत आमिष, मतलब पराग आहे

जगण्यास एकसूरी कैसा सरावलो मी
बहुतेक रागिण्यांचे दर्शन महाग आहे

चित्रास श्वेत-श्यामल करडी छटाच शोभे
भरलास रंग तू जो तो रंग डाग आहे

सुटणार चिंतनाने नाहीत प्रश्न सारे
हातात शस्त्र अंती घेणेच भाग आहे

विस्तीर्ण सागरावर ओवाळ जीव सरिते
'विक्षिप्त' निर्झराच्या साठी तडाग आहे