रुद्रायन

असा शब्द सहज भेटायला आल्यावर काय करायचे?
जाणुन घ्याय्चे त्याचे अंतरंग
त्याचे भाजले पण
त्याचे अस्तित्व?


असे अर्थ लागण न झालेले शब्द
जमवतोय मी... उल्कांचे अवशेष
पण वापरतोय परिचित हत्यार
यमक गमक मात्रा व्रुत्ते अलंकार
त्यांच्या जपणुकिसाठी


सतत काय मिळाले हे शोधणारे लोक
कित्येकदा येतात भावार्थ हुंगत
आणि नाकारून जातात ...
खुप चिरंतन असे काही
माझा नाइलाज आहे!


रुद्रायन हे निराकार आहे!
अशा रचनेचा अर्थ काय लावाल
बापड्यांनो?