सचिनदेव बर्मन

सचिनदेव बर्मन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रसिक मनोगतींकडुन एकाद्या सुंदर लेखाची अपेक्षा होती पण त्यांची आठवण कुणीच ठेवली नाही याचे नवल वाटले.माझ्या मते सचिनदेव बर्मन असे एकमेव संगीतकार होते जे कारकीर्दीच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत नवनवोन्मेषी संगीत देत राहिले.त्यांचे समकालीन नौशाद,ओ.पी नय्यर असे संगीतकार अगदी निष्प्रभ वाटत होते अशा वेळी सत्तरीच्याही पुढील बर्मनदा अधिकच उत्साहाने संगीतात नवनवीन प्रयोग करत होत.उत्तम संगीतकार असून ते तेवढेच उत्तम गायक होते.त्यांचे क्रीडाप्रेम हा आणखी एक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू होता. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त माझे नम्र अभिवादन !