उर्मटपणा नसावा लुब्रेपणा नसावा


उर्मटपणा नसावा
लुब्रेपणा नसावा


टीका जरुर करावी
कडवटपणा नसावा


मत आधुनिक परंतू
भोंगळपणा नसावा


घाई करू नये पण
चेंगटपणा नसावा


दुसऱ्यास श्रेय द्यावे
स्वार्थीपणा नसावा