चंद्र निश्वास सोडिल

चंद्र निश्वास सोडिल

चंद्र निश्वास सोडिल, श्वास फुलं रोखतील |
विषय 'सौंदर्य' येता, सर्व तव नाव घेतील || धृ ||

आहे चेहरा असा तव, उजळे दिस दीप्ती घेऊन |
ज्या स्थळी तू न असशी, त्या स्थळी ये अंधारून ||
कैसे मग शांत तुजविण, तुझे बदनाम होतील |
विषय 'सौंदर्य' येता, सर्व तव नाव घेतील || १ ||

नेत्र नाजुक कळ्या त्या, बोल कोमल डहाळ्या |
ओठ गंगाकिनारे, केस स्वर्गीय वाटा ||
तुझ्याखातर देवदूत, शिरी आरोप घेतील |
विषय 'सौंदर्य' येता, सर्व तव नाव घेतील || २ ||

चाँद आहे भरेगा ह्या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद.

मूळ हिंदी गीत: आनंद बक्षी
संगीत: कल्याणजी-आनंदजी
गायक: मुकेश
चित्रपट: फुल बने अंगारे
साल: १९६३
भूमिका: माला सिन्हा, राज कुमार

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१०१५