दिशा

प्रिय मनोगतिंना,


रोज ऑफिस ला जाताना सहजच लक्ष जाते ते सिग्नल ला पैसे मागणाऱ्या कोवळ्या जीवांकाडे... फार यातना होतात , जे वय खरे तर कसलीच काळजी न करता फ़क्त बागडायचे असते, ज्या हातांनी मातीत मनोरे रचायचे असतात , तेच हात दुसर्यांपुढे पसरावे लागतात ....


सगळ्यात वाईट वाट्ते जेव्हा एखाद्या लहानग्याचे भांडवल केले जाते त्याच्याच जन्मदात्रीकडून केवळ चाराणे-आठाणे मिळावेत म्हणून... ह्या गोष्टी थांबल्याच पाहिजेत असे वाट्ते, केवळ हॉटेल मधलेच बालाकामगार बंद व्हावेत म्हणून प्रयत्न का? ह्या रस्त्यावर श्वास घेत असलेल्या भावी पिढीचा वारस कोण?


माझ्या एका हितचिंतकाने सांगितले की "हे थांबवणे अवघड आहे.. ह्यांची मोठी चेन असते, खरा गॉड्फ़ादर वेगळाच असतो", कधी कधी मलाही वाट्ते खरच ते मुलही खोटं आणि ती आई पण खोटीच असेल ... काहीही असो शेवटी एखादं फुलच उमलण्या आधी सुकतय ना?


मला थांबवायच आहे हे सारं , कोणी दाखवेल का मला योग्य दिशा?


-अंजली