ती डौलदार झाली...२

प्रेमा तयार झाली
प्रीती पसार झाली

काठी असे धुण्याची
ती डौलदार झाली

भुवयांस कोरले अन
दातांस तार झाली

ज्या मैफिलीत गेलो
ती गप्पगार झाली

मदिरा पिऊन आता
वर्षे चिकार झाली

गेंडे सफेद होते
ज्यांची शिकार झाली

वाणी करी तगादा
इतकी उधार झाली

ही 'खोडसाळ' रचना
अगदी सुमार झाली

आमची प्रेरणा इथे वाचा