एक पृथ्वीमोलाची अडचण -

मी गेल्या पाच-साडेपाच वर्षांच्या देशाबाहेरच्या भटक्या जीवनक्रमानंतर येत्या नोव्हेंबरात मुंबईत परततो आहे. अशा वेळी  जगण्यासाठी अत्यावश्यक गरजांचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. तर मग मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बजाज पल्सर १८० की १५० ... ?
मनोगतींपैकी कुणाचं यावर चिंतन असेल, कुणाचे अनुभव असतील तर कृपया बोलावं ही विनंती. 
मी पूर्वी बजाज काळिभ्भोरवरून लई भटकलो असलो, तरी एकंदरीत मी काही अतिरीक्त वेगाचा भोक्ता नाही. दोन्हींमधे खालील गोष्टींवरून तुलना करायची आहे -
१] फ़ेरीची गुणवत्ता वा आरामदायकता
२] वाहनाची / इंधनाची किफ़ायतशीरता
३] इंजीनमधील दोष
४] गिअर टाकताना होणाऱ्या भानगडी आणि
५] वाहनाची एकंदर वागणूक वा त्रासदायकता


यांपलिकडे आणखी कशावर विचार व्हावा असं वाटत असेल तर कृपया तेही लिहा.