माणसे - २

आमची प्रेरणा इथे  वाचा

धान्यासमान दळतो जात्यात माणसांना
पीठासमान भरतो पोत्यात माणसांना

स्वप्नात पाहिले मी त्या चटकचांदणीला
नाचून रिझवते ती गुत्त्यात माणसांना

आता कधी , कुठेही पीण्यास सिद्ध झालो
घेऊन हिंडतो मी पेल्यात माणसांना

आश्चर्य काय त्यांचे चारित्र्य स्वच्छ नाही
नेतात अंगवस्त्रे खड्ड्यात माणसांना

कार्यालयी दिवाळी, खाऊ फराळ वजनी
चरण्यास खूप असते खात्यात माणसांना

ओळख म्हणून उरली ही थोटके विड्य़ांची
मी स्पष्ट पाहिलेले झुरक्यात माणसांना

मुसळांमध्येच होते गणना तुझी अताशा
खुपतोस खोडसाळा डोळ्यांत माणसांना