चिकनविंदालू

  • २५० ते ३०० ग्राम बोनलेस चिकन,२ कांदे,२ टोमॅटो,४ उकडलेले बटाटे
  • गरम मसाला २ चहाचे चमचे,चिकन मसाला ३ ते ४ चहाचे चमचे,
  • मीठ,तिखट,मिरपूड चवीनुसार,तेल १.५ टेबलस्पून,१/४ कप दूध,थोडी मलई,४,५ टेबलस्पून दही
  • मूठभर चिरलेली कोथिंबीर,थोडा तंदूर रंग(वैकल्पिक)
२ तास
२ जणांना

चिकन धुवून,साफ करून चौकोनी तुकडे करा.(तुकडे खूप मोठे नकोत)दही पाणी न घालता घुसळून घ्या,त्यात मीठ,तिखट,चिकन मसाला घालून हे तुकडे ५,६ तास मुरवत ठेवा.
बटाटे उकडून घ्या,त्यातील १.५ बटाट्याच्या भाजीला करतो तशा फोडी करा. उरलेल्या बटाट्याचा लगदा करा(प्यूरी).कांदा चौकोनी चिरा,टोमॅटो उकडून घ्या,साल काढून टाका व लगदा करा( किवा तयार प्यूरी वापरा)
तेल गरम करा,त्यात कांदा घालून परता,कांदा मऊ झाला की टोमॅटो प्यूरी घालून परता,गरम मसाला घालून परता,दह्यात मुरवलेले चिकनचे तुकडे घालून परता(त्यातलेदही घालू नका)२,३ वाफा येऊ द्या,बटाट्याचा लगदा, थोडी मिरपूड,चवीनुसार मीठ,तिखट घाला(दह्यात मुरवताना आधी घातले आहे हे लक्षात घेऊन)
१/४ कप दूध घाला,पाणी घालून हवे तेवढे सरसरीत करा,उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला,हलक्या हाताने ढवळा,चांगली उकळी येऊ द्या. मलई घाला,थोडासा तंदूर रंग घाला,कोथिंबीर अगदी शेवटी घाला म्हणजे रंग  बदलणार नाही.
भात,पोळी,पाव कशाही बरोबर खा.(याबरोबर मकाभात छान लागतो)

लाल तंदूर रंग+हिरवीगार कोथिंबीर असं विंदालू पांढऱ्याशुभ्र भाताशी खायचं(मध्येच सोनेरी पिवळे मके!)अहाहा..असं रंगीत जेवताना जोडीला संगीत असेल तर... सुख सुख म्हणतात ..ते हेच!

आमच्या फ्लेमिंग आजीआजोबांची अजून एक आवडती फर्माईश...

नवरा,त्याचा स्त्रोत-त्याच्या कार्यालयाजवळ असलेले 'भूचाल'नामक उपाहारगृह