सुरभी, मराठी नभोवाहिनी.

लोकसत्ता, सोमवार, १३.११.०६.

उपग्रहाच्या साह्याने डिजीटल नभोवाणीसेवा देणाऱ्या 'वर्ल्डस्पेस'ने 'सुरभी' ही मराठी नभोवाहिनी सुरू केली असून ती २४ तास चालू राहणार आहे.

मराठी साहित्य आणि संगीतावर आधारीत कार्यक्रम हे 'सुरभी'चे वैशिष्ट्य असणार आहे. 'वर्ल्डस्पेस सॅटेलाईट रेडिओ'ने यापूर्वीच आठ भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये वाहिन्या सुरू केल्या आहे.

भक्तिगीते, लोकगीते, भावगीते, अभंग, पोवाडे, नाट्यपदे आणि लावण्या ऐकण्याची सुविधा जगातील मराठीजनांना सुरभीमुळे मिळणार आहे. यात 'तिसरी घंटा' ( नाट्य), 'ऐका दाजीबा( लावण्या, लोकगीते), 'वाचाल तर वाचाल" ( साहित्यावरील कार्यक्रम) आणि  'तो हा सुनील बर्वदा' ( सुनील बर्वे यांच्या निवेदनासह आवडीची गाणी) असे एकंदरीत स्वरूप असणार आहे.

यासाठी १९०० रुपयांचा रिसीव्हर खरेदी करावा लागतो. त्यावर ४० हून अधिक नभोवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात.

वर्ल्डस्पेसचे मुख्यालय वॉशिग्टनात आहे आणि १३० देशात श्रोते पसरलेले आहेत.