उचलून पायताणं बडवायला मला

उचलून पायताणं बडवायला मला
आल्या कुठून साऱ्या झोडायला मला?

भाजी नको मला ती अन आमटी नको
काळीज ठेव थोडे ते खायला मला

खाऊन ओळ गेली केव्हाच वाळवी
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

बघतो कधी इथे मी, बघतो कधी तिथे
आहे कुणीतरी का पोसायला मला?

मी रात्र 'ड्राय डे'ची जागून काढली
मिळणार घोट नव्हता रिचवायला मला

खेटायला हवी ती ना खेटली कधी
बिलगे कशी अरिला खिजवायला मला!

कैसे उदर भरावे हे 'खोडसाळ' मी
उरलेत दात कोठे कोरायला मला?



आमची प्रेरणा चित्तरंजन ह्यांची गझल 'आहे बरेच काही सांगायला मला'  इथे वाचा.