पाहुनीया घेतलेला दांडका

पाहुनीया हातातला दांडका

आग्रहाने वाढलेला दोडका
 का असा मी बायकोचा लाडका?

पाहुनीया घेतलेला दांडका
वाढला ओठातला हा हुंदका

दोष नाही माणसांचा एवढा
कोच होता हा कधीचा मोडका

मी पडावे मस्त जेव्हा जेवुनी
तू पसारा आवरावा नेटका!

सिगरेटीं संपता धुंडाळतो
राहिलेला जीर्ण माझा थोटका

मी जरी असतो इथे,असतो तिथे
श्वापदांमध्ये कसा मी  'पोरका' !

(प्रेमवीराची देखणी चंद्रिका
पाहुनीया कोपली का तारका?)

वस्त्र झाले रेशमी अन देखणे!
मेकपाला भाव आला नेमका



- कारकून


नीलहंस ह्यांच्या गझलेवर आधारित ऐकला साधा तुझा जो हुंदका