विमानात दूध पाजणे

नुकतीच (१३ ऑक्टोबरला) इथल्या बर्लिंग्टन, व्हेर्मॉन्ट या विमानतळावर ही घटना घडली.  एक महिला तिची २२ महिन्याची मुलगी आणि नवरा बर्लिंग्टन ते न्यूयॉर्क असा विमानाचा प्रवास करीत होते.  विमानाला ३ तास उशीर झाला होता आणि ते आता थोड्या वेळात सुटणार होते.  हे कुटुंब शेवटून दुसऱ्या रांकेत बसले होते.  ती महिला खिडकीजवळ होती.  तिने विमान सुरू होण्याच्या थोडे अगोदर मुलीला दूध पाजायला घेतले.  त्यावेळेला विमानाच्या परिचारिकेने तिला पांघरूण देऊन मुलीस झाकायला सांगितले.  त्या महिलेने त्यास नकार दिल्यावर तिने त्या कुटुंबास खाली उतरायला सांगितले.


त्यावेळेला जास्त गोंधळ नको म्हणून वादावादी न करता पण अपमानित होऊन रूदन करीत ती व तिचे कुटुंब विमानातून नाईलाजाने खाली उतरले.  तिने आता विमान कंपनी (फ्रीडम एअरलाईन्स + डेल्टा ) यांच्याविरूद्ध तक्रार नोंदवली आहे.


या प्रकरणात दूध पाजणाऱ्या महिलांचा पाठिंबा म्हणून आज बऱ्याच विमानतळांवर महिलांनी डेल्टा विमान कंपनीच्या तिकिट काऊंटर्स समोर (मराठी प्रतिशब्द?) आपल्या मुलांना दूध पाजून आपला निषेध नोंदविला.


याप्रसंगाची एक बातमी इथे वाचायला मिळेल.


माझ्या मते यात परिचारिकेची चूकच होती परंतु अशा प्रकारे निदर्शने, निषेध करणे हे एव्हढे योग्य नाही.


आपले काय मत आहे?


कलोअ,
सुभाष