संजय दत्त दोषी - कायदेगिरी

नव्याने जागृत झालेल्या गांधीगिरीकडे दुर्लक्ष करत न्या. कोडे यांनी "कायदेगिरी" सांभाळली आणि योग्य कारणांसाठी संजय दत्तला दोषी ठरवले. (म्हणूनच त्यांनी त्याला अतिरेकी वगैरे आरोपातून मुक्त ही केले).


मला संजय दत्त बद्दल काही व्यक्तिगत राग अथवा द्वेष नाही पण आजच्या निर्णयामुळे कायद्यापुढे सर्व सारखे हे सिद्ध झाले त्याचा आनंद नक्कीच झाला.


आता हा "काउंटडाऊन" आहे अशी आशा करू अजून असे कमितकमी दोन आहेत ज्यांना कायद्याचाअ बडगा योग्या कारणासाठी दिसावा अशी अपेक्षा: एक म्हणजे सलमान खान आणी दुसरा राहूल महाजन...