साईबाबा!

नमस्कार,


आज २ आठवडे उलटले शिर्डीला जाऊन साई बाबांचे दर्शन घेऊन. आजहि ती मुर्ती डोळ्यासमोर तशिच दिसते, फ़ार बरें वाटले होते तेव्हा, पण मनात एक सल राहिली.


आज आपल्या भारत वर्षात असंख्य मंदिरे आणि देवालये आहेत, त्यात देवही बरेच आहेत. त्यांच्या दर्शनाला जाणारा जनसमुदायही बराच मोठा आहे. आता तुम्ही म्हणत असाल मी हे का सांगतोय? त्याची कारण असें कि आपल्या मनोगतींपैकि जवळजवळ सगळ्यांनी शिर्डीला भेट दिली असावि. आता आपल्याला माहित आहेच (आपल्याला माहित आहे हे गृहित धरून) कि बाबांच्या दर्शनाला किती संख्येने लोक येतात आणि किती भलिमोठी रांग असते.


हे सांगितले अश्यासाठी कि आपण जातो देवाच्या दर्शनाला, अशावेळि आपला प्रमुख हेतु हा देवाचे दर्शन असला पाहिजे, पण बऱ्याचवेळी असे दिसुन येते कि कुठल्याहि देवाच्या दर्शनापेक्षा लोकांना आपण घरी कधी जातो अथवा लवकरात लवकर दर्शन कसे होइल याची जास्त काळजी असते. आता त्या दिवशी मि जेकाहि अनुभवले ते सांगतो.


मि, आई, माझी अर्धांगीणी, माझे सहकर्मचारि आणि त्यांच्या अर्धांगीणी असे सगळे जेव्हा दर्शनाच्या रांगेत उभे होतो त्याचवेळेत गर्दीचा फ़ायदा घेउन एक अख्खे कुटुंब आमच्या बाजुने धक्कादेत पुढे निघुन गेले, कारण विचारता ऊत्तर मिळाले कि पुढे रांगेत आई वडिल उभे आहेत, नंतर असे आढ्ळुन आले कि त्यांच्या सोबत आई वडिल कोणीच नव्हते, आत्ता या सोप्या मार्गाने बरेच लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करु लागले. मला हेच वावगे वाटते कि जी व्यक्ती देवाच्या दर्शनाला येते ति काहि क्षुल्लकसा वेळ वाचविण्यासाठी देवाच्या दारिही कशी खोटं बोलु शकते. आश्या लोकांना जनाचि नाही पण मनाचि लाजहि वाटत नाहि का?


हा असा प्रकार आणि यांसारखे आणखी प्रकार हे प्रत्येक मंदिरात घडत असतात. मला तरि या प्रकारांची भयंकर चिड येते, अशा प्रकारां बद्द्ल आंपणांस काय वाटते?


आपण अशा प्रकारांना रोखण्यासाठी काय करु शकतो.... ?


असे आणखि काही प्रसंग येथे सांगावेत आणि आपण या समस्येला सकारात्मकरित्या कसे सोडवू शकू याचि चर्चा करावि...