पृथक्-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल पृथक्

सॅलेड खाऊनी हे मन तृप्त होत नाही
वाढीव पोट माझे का लुप्त होत नाही

सरताच पावसाळे, सुकतात पाणसाठे
मोरीतल्या नळाचा गंगौघ होत नाही

कोणी तलाव गाठी, कोणी नदीत जाई
ह्याच्या मुळेच पाणी बघ शुद्ध होत नाही

पश्चात जेवणाच्या येताच खीर वाट्या
एकाच वाढणीने संतुष्ट होत नाही 

अठवून काय घडले सुटलाय कंप मजला
सांगायची कुणाला अन भीस्त होत नाही

कोणी तरी अता का सांगल "केशवा'ला      
पृथगात्मते कवी हा पण श्रेष्ठ होत नाही