काव्य

 ना समजुनी जरासे तो मठ्ठ होत नाही
 वाचून जाहले ते ते  पाठ होत नाही 

झरतात काव्यधारा, सुकतात वाचणारे
का बोलते कुणी प्रतिसादात होत नाही?

कोणी मुहूर्त पाही, कोणी निघून जाई
देण्यास दान कोणी  बघ कर्ण होत नाही..

अर्थात लेखनाचे  असतात भिन्न मार्ग
एकाच  लेखनाने साहित्य   होत नाही

घालून  ओळ पुढची पडतात चार गझला
ऐसे करून काही पण काव्य होत नाही

आभार मान तूही येथे सगल जनांचे
की लेखणी तुझी अजुनी जप्त होत नाही..
- कारकून

आधारित मिलिंद फणसे- पृथक्