स्त्री म्हणजे आईची वत्सलता

स्त्री म्हणजे आईची वत्सलता
स्त्री म्हणजे लेकीची अल्लडता

स्त्री म्हणजे धरणीची पोषकता
स्त्री म्हणजे सरितेची निर्मलता

स्त्री म्हणजे वेलीची नाजुकता
स्त्री म्हणजे कुसुमाची मोहकता

स्त्री म्हणजे भक्तीची आर्जवता
स्त्री म्हणजे शक्तीची व्यापकता

स्त्री म्हणजे छायेची शीतलता
स्त्री म्हणजे मायेची उत्कटता

स्त्री म्हणजे लक्ष्मीची मंगलता
स्त्री म्हणजे अंबेची सात्त्विकता

- माफी ८ मार्च २००७