मुंबईबाहेरचे घर छान!

(चाल : कुर्बानी कुर्बानी कुर्बानी ...)

मुंबईबाहेरचे घर छान... दोन खोल्या भरपुर
सामान
बायको माझी म्हणते रोज ... "मुंबईमध्ये नेऊन आण."

हय् ठाकुर्ली,
डोंबिवली, आंबिवली...
परवा तर मालगाडी थांबवली ।।धृ।।

गर्दी झाली, काय करू? ... ए नको रे घाबरू

दोस्ता, आपण मर्दासारखे...
चालती गाडी धरू ...चालती गाडी धरू

हे.....
जागा नोकरीची झकास... जाऊन यायला बारा तास
फर्स्टक्लासचा मी
घेतलाय पास... स्वच्छ डब्यातुन उभा प्रवास
हय् ठाकुर्ली... ।।१।।

सुट्टी आहे रे उद्या ... पावभाजी खाउया
उजेडात
दिसते कसे घर...
एकदा ते पाहुया...एकदा ते पाहुया
हे.....
मज्जा
राहण्यातली घरी... येते हो दर रविवारी
आठवडाभर दमल्यावरती... टी व्ही बघतो
दिवसभरी
हय् ठाकुर्ली... ।।२।।

भाग अपुला चांगला ... झाडतात दर वर्षाला
राहणीही
उच्च आहे ...
भाव दुप्पट भाजिला... भाव दुप्पट भाजिला
हे.....
घेऊया
उकळुन पाणी ... लावूया मच्छरदाणी
बसस्टॉपवरच्या महारोग्याला ... रांगेतुन टाकू
नाणी
हय् ठाकुर्ली... ।।३।।

मुंबईत सारी सुखं, ... मुंबईची कौतुकं
मुंबईच्या
गप्पा ऐकुन ...
जळति नातेवाइक... जळति नातेवाइक
हे.....
मुंबईच्या बाहेर
जगू ... मुंबईची स्वप्ने बघू
मुंबईमधला पेपर वाचत ... मुंबईच्या वारीस
निघू
हय् ठाकुर्ली ... ।।४।।


ठाणे १९८६