कंठात प्राण आले

आता कुठे जरासे माझे लिहून झाले
इतक्यात वाचकांच्या कंठात प्राण आले?

तोडू नकोस तारे, सोडू नकोस पिल्ले
गंभीर वाचकांचे शेरे मला मिळाले

लांगूलचालनाचा त्यांनी ठराव केला
जे जे म्हणाल तुम्ही ते ते करू म्हणाले

झोपेत घोरताना तो आपसूक मेला
स्वप्नात भेटले ते सारे कवी निघाले

कंपूत कोण म्हणतो की एकजूट नाही?
मी एक काव्य केले, सगळे तिथे उडाले!

- माफी

नीलहंस ह्यांच्या शब्दांत प्राण आले वर आधारित