अफलातून जाहिरातमाला संग्रह ( माळ तिसरी)

( सहज विरंगुळा म्हणून हे लिहिले आहे. कुणालाही दुखावण्याचा यात हेतू नाही. ज्या जाहिरातींवर हे आधारित आहे त्या मुळ जाहिराती आठवल्यास हे वाचतांना मजा येईल )

मणी क्र. १ :

एका समारंभात नवरा बक्षीस घेतांना त्याचा सदरा मळलेला असतो. त्याचे वरिष्ठ म्हणतात : " आजच्या दिवशी एवढा मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ? "

संतापून नवरा समोरच्या खुर्चीवर बसलेल्या बायकोकडे बघतो.

बायको म्हणते : " एक वेळ बदलून टाकेल मी नवऱ्याला, पण ... माझी धुण्याची साबण वडी नाही बदलणार! "

(पाहिलंत? आमच्या साबण वडीवर किती विश्वास आहे महिलांना! आजच, आताच घ्या आमची वडी...)

मणी क्र. २ :

एक बार तेरा वर्षाची मुलगी एका तरंगणाऱ्या हिरव्यागार पानावर मोकळे केस सोडून उभी राहून म्हणते : " माझे जहाज, आहे ना छान? .... कोठून आणले विचारता? ... सांगू ? भाड्याचे आहे!

मग ती पांढरे स्वच्छ केस दाखवते : " माझे केस! आहे ना पांढरे शुभ्र! ... कसे काय पांढरे झाले विचारता? .... सांगू? ...

                                    आं .... मी नाही सांगणार ! "

( बघितलंत.. ती जरी नसेल सांगत तरी, आम्ही सांगतो ना! ही कमाल आहे आमच्या शांपूची... वापरा आमचा शांपू.. केस करा शुभ्र ... शुभ्रतेची चमक ! पुन्हा पुन्हा! ) 

मणी क्र. ३ :

प्रतिनिधी : " पाहा पहा, ही लगबगीने जाणारी लोकं.. यांना विचारू या आपण यांनी काय खरेदी केलंय ते. "

एकीला तो विचारतो : " आपण काय खरेदी केलंत? "

ती : " लख्ख-उजेड " धुण्याची पावडर..

प्रतिनिधी दुसरीला : " तीने बघा " लख्ख उजेड " ला आपलंसं केलं...आणी तुम्ही ? "

दुसरी : मी? " अंधार " पावडर!

( आला लख्ख उजेड ... चार थेंबांचा हा हा..)

मणी क्र. ४ :

शिक्षक : " ही आहे आपल्या दातांची रचना ! , अरे काजू , तुझे दात तर खुप पिवळे झालेत? याचे रहस्य सांग! "

काजू : " का नाही होणारे ते पिवळे, मास्टरजी ! मी 'हार्बर' चे पिवळे दंतमंजन वापरतो ना! "