अफलातून जाहिरातमाला संग्रह (शेवटची एका मण्याची माळ)

आजकाल बक्षीस देण्यासाठीच्या काही रेडीओ/टि. व्ही वरच्या कार्यक्रमांत असे काही प्रश्न विचारतात (आणि उत्तरासाठी असे हास्यास्पद पर्याय देतात) की हसावे की रडावे ते कळत नाही. बक्षीस दिले जाते आणि वस्तूची जाहिरात पण होते.

नमस्कार! आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारणार आहो. नीट उत्तरे द्या. सगळी उतरे बरोबर देणाऱ्याला जगप्रसिद्ध महागडा टि. व्ही. मोफत.

पहीला पश्न : अमिताभ कोण आहे?

१. मनुष्य २. प्राणी ३. अभिनेता ४. परग्रहवासी ५. नृत्य दिग्दर्शक

दुसरा प्रश्न : पृथ्वी चा आकार कसा आहे?

१. त्रिकोणी २. षटकोनी ३. गोल ४. सांगता येणार नाही ५. डोळ्याने दिसू शकत नाही

तिसरा प्रश्न :  चंद्रावर गेलेल्या पहिल्या माणसाचे नाव काय?

१. निळकांत भुजबळ २. नील आर्मस्ट्रॉंग ३. रोबोट ४. माहीत नाही

चौथा प्रश्न : सगळयात चपळ प्राणी कोणता?

१. गोगलगाय २. अमीबा ३. हरीण ४. बाण ५. हवा ६. प्रकाश

पाचवा प्रश्न : तुमचा आवडता टि. व्ही. कोणता?

१. माकोडा २. मुंगळा ३. शांत सुई ४. हवाई