सखि थंड झाला बारक्या

सखि थंड झाला बारक्या आता तरी देशील का ?

किटलीत आहे चाय अन ओठात आहे गीतही

ते रडगाणे थांबवणारे बिल तू देशील का ?

इडली सांबार चटणी घेतलीस तू रेटोसुनी

हा घास अंतीम राहिला त्या "अर्थ" तू देशील का ?

जे जे हवेसे  जेवूनी ते सर्व आहे चापले

तरीही ऊरे काही उणे तु पुरे करशील का ?

बोलावल्या वाचूनही शेठ जरी आला इथे

थांबेल तोही पळभरी , पण बिल तू देशील का ?

 विनम्र - ८ सप्टेंबर ०७