(अर्घ्यदान)!

आहे तुरुंग जाया, मी फूल म्लान आहे
आता हरेक नारी मातेसमान आहे

 देतात मित्र भरुनी पेले कशाकशाचे?
घोटात दोन माझे झाले विमान आहे

चिंता अता कशाची सुरईस जवळ घेता?
येथे निळ्या निशेची चढती कमान आहे

आश्चर्य यात नाही की मी पशू बघावे
ऍनिमल प्लॅनेटवरचे जग छानछान आहे

काढुनिया गळे जे ढोंगे करीत येथे
नशिबात चोंबड्यांच्या 'फूटेज'छान आहे

आहे अमान्य गाथा सेतू नि सागराची
शबरी, कलीयुगाचे हे 'दाम'गान आहे

वाटे कधी उदेला, अस्ता कधीच गेला?
होता 'विमान' सारे दोलायमान आहे

अमुचा 'विठू' निराळा जाळीमधून गातो
माणूसबोल त्याचा ना भासमान आहे

यावे अवश्य घेण्या दसऱ्यानिमित्त पाटी
काठी सरस्वतीच्या माझे दुकान आहे

एकेक चीज आता 'रंगेल' झ्याक ऐशी
रस्ता खुला समोरी,तोंडात पान आहे

काव्यात वार होती, मीही प्रयत्न केला
तल्वार ही न हाती नुसतेच म्यान आहे

वर्षानुवर्ष ज्याची गाडी पुढे न गेली
तो आद्य साबणांचा हा स्वाभिमान आहे

घेईन नाव गुरुचे ही लायकी न माझी
अदिती तुझ्या पदीच्या धूळीसमान आहे

--अदिती
(आमचे गुरुदेव श्री श्री खोडसाळपंत यांच्या चरणी सादर अर्पण)
१: 'रात नीली नीली है' ही खलबली गाण्यातली ओळ इथे आधारभूत आहे

(काही भाग वगळला : प्रशासक)