आज कुणाला सांगुन गेला

आज कुणाला सांगुन गेला

आज कुणाला सांगुन गेला
गुपित कळीचे खट्याळ वारा
रान नाचले हर्षभराने
नभास भिडला मोरपिसारा

दवबिंदुंचे अमृत घेवुन
किरणांची मग रत्ने झाली
चोचींमधुनी सुटले गाणे
लाल गुलाबी संध्या झाली

प्रतिबिंबाला पकडू पाहे
लाडिक मासा पाण्यामधला
नक्षत्रांनी अंगण सजले 
अवसेलाही चंद्र उगवला

 घेवुन शेला चैतन्याचा 
मनात शिरला अवखळ पारा
आज कुणाला सांगुन गेला 
गुपित कळीचे खट्याळ वारा.....