वसा !

जागतिक महिला दिनानिमित्त....

पुन्हा भरारी घेऊ दे मला
पंढरी वारी नेऊ दे मला !

नको रे मना ! ओढ ताऱ्यांची
प्राजक्त दारी वेचू दे मला !

जिवा शिवाचा भेद कशाला
मुरली-मीरा होऊ दे मला !

तुफान लाटा; उद्धस्त वाटा
दीप अंधारी तेऊ दे मला !

जरी आकाशी ध्यान पिल्लाशी
मोल दुधाचे जाणू दे मला !

सावित्री तुझा दुर्घट वसा
अमृतगाणे गाऊ दे मला !