(..... न ऐकायचे)

केशवसुमारांनी निवृत्ती घेताना आम्ही त्यांना "आगे बढो" अशा शुभेच्छा दिल्या होत्या. पण हास्यरसाचे फवारे एकदम कमी झालेले दिसल्यामुळे, त्यांनी पुनःश्च मैदानात उतरावे असे आम्ही (विडंबनाच्या रुपात) आवाहन करतो

प्रेरणाः ..... न ऐकायचे

ठरवले मनाचे न ऐकायचे,
    आज एक तरी काव्य पाडायचे

सगळ्यांस ती श्रावणासारखी,
    विजेचे मलाच कसे भास व्हायचे?

घरे आज पडती मनाला तरी
    जखमेस स्वतःच उकरायचे

शिकवणीचे फायदे मी सांगू किती
    पोरीस तिथल्याच पटवायचे

नवे काव्य येता पुढे एकदा
    धुवोनी तया स्वच्छ काढायचे

'कसं चाललंय' जर विचारले कुणी
    'निवृत्त' ऐसेच सांगायचे!

नका ऐकवू मज सदा-सारखे
    कसे मग स्वतःस आवरायचे??

'पुरे फोडणे!' काव्य म्हणते मला
    जात्यास इतुके का फिरवायचे!!