धूम मचा ले!

स्थळ:  अज्ञात.

वेळ: शनिवार, पहाटेचे १. ३० वाजले आहेत.

पात्रे:  १० मित्र. यामधील ३ जण दुचाकीस्वार आणि इतर मदतनीस म्हणून.

धूम मचा ले!!!

ऱ्हूम, ऱ्हूम... तिन्ही दुचाकीस्वार (दुस्वा) तयार... पाँआँआँ.. भोंगा वाजतो.

स्पर्धा सुरु. काही अवधीनंतर स्पर्धा संपली.

दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वाने पहिल्या क्रमांकावर आलेल्या दुस्वा पेक्षा:

              १२ मिनिटे वेळ अधिक घेतला आणि वेग १५ किमीने कमी होता.

दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वाने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वा पेक्षा:

              ३ मिनिटे वेळ कमी घेतला आणि वेग ३ किमीने अधिक होता.

प्रश्न: प्रत्येक दुस्वा ने स्पर्धा संपवायला किती वेळ घेतला?

महत्त्वाच्या सुचना:

१. रस्ता अत्यंत सरळसोट, खड्डेविरहित, कित्येक किमी लांबीचा आहे.

२. स्पर्धा संपेपर्यंत कोणताही दुस्वा, वाटेत कोणत्याही कारणाकरता थांबला नाही.

३. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व दुस्वा वेग सातत्य राखून होते.

४. स्पर्धेकरता वाहतूक पोलीसांची परवानगी घेतली होती.

५. सर्व दुस्वांच्या डोक्यावर हेल्मेट होते.