खुळ्यागत बहकतो संथ लयबध्द श्वास
वेल कल्पनेची चढे दूर वास्तवाचे भास
नादावतो अंतरात स्वर जूनहिंदोळ्याचा
अंग अंग आळसावे, थाट गंधित मनाचा
हळू धुंदावत जातो पापण्यांचा आसमंत
शांतपणे विसावतो स्वप्नसागर अनंत
असे घेऊन रंग क्षण अवचित् येतो
साथ ओठांची घेऊन सखे तुला आठवतो...